मांडवे येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त अभिषेक, गजी ढोल आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन

मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा देवाच्या यात्रेचे आयोजन मंगळवार दि. ४ जून ते गुरुवार दि.६ जून पर्यंत समस्त ग्रामस्थ मांडवे व खंडोबा यात्रा कमिटी, मांडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळवार दि. ४ जून रोजी सकाळी ९ वाजता खंडोबा देवाचा अभिषेक होणार आहे. तर दुपारी ४ वाजता श्री महालिंगेश्वर गजी ढोल मंडळ, खुडूस यांचा गजी ढोलाचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ९ वाजता कुमारी कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ, कराड यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. ५ जून रोजी सायंकाळी ९ वाजता झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा कोल्हापुर यांचा मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार दि. ६ जून रोजी सकाळी ७ वाजता श्री खंडोबा देवाच्या पालखीची भव्य मिरवणूक (छबिना) काढण्यात येणार आहे.
तरी या यात्रेस पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, समस्त ग्रामस्थ मांडवे व खंडोबा यात्रा कमिटी, मांडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.