जपानी भाषा प्राविण्य परीक्षा N2 मध्ये सुशांत सुभाष वाघमारे उत्तीर्ण

सातारा (बारामती झटका)
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी विद्यार्थी सुशांत सुभाष वाघमारे हे जुलै २०२४ मध्ये जपानी भाषा प्राविण्य परीक्षा JLPT – 2 परीक्षेस बसलेले होते. या परीक्षेचा निकाल दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर झाला असून या अति महत्वाच्या परीक्षेत सुशांत सुभाष वाघमारे यांनी उत्तीर्ण होऊन सुयश मिळविले आहे.
सुशांत वाघमारे यांना जपानी भाषा शिकण्याची आवड असून जपानी भाषेतून करीयर करण्याची त्यांची इच्छा आहे. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी त्यांनी जपानमधील टोकियो येथील इंटरकल्चरल इन्स्टिट्यूट आकीहाबारा मध्ये प्रवेश घेऊन जपानी भाषेमध्ये शिक्षण घेतले होते. स्कूल अंतर्गत भाषिक आविष्कार करणाऱ्या शालेय चाचणीत देखील यश मिळविले होते. सुशांत यांनी या पूर्वी एन -5, एन – 4 या परीक्षेत चांगले यश मिळविले आहे.
टोकियो येथे दीड वर्ष वास्तव्य करून शिक्षण घेत असताना पार्ट टाईम जॉब करून तिथे नोकरीमध्येही उत्कृष्ट काम केल्याचे बक्षीस मिळविले होते. सुशांत वाघमारे हे छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे व जयसिंगराव करपे विद्यालय वर्ये येथील मुख्याध्यापिका सुनिता सुभाष वाघमारे यांचे द्वितीय चिरंजीव आहेत. सर्वांनी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले असून शिक्षणाच्या नवनव्या क्षेत्रांची माहिती मिळवण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

सुशांत वाघमारे हे सध्या एन. – 5 या परीक्षेचे मार्गदर्शन करत असून शिक्षण घेण्यासाठी ७७ ०९ १७ ४६ ८० या मोबाईलवर इच्छुकांनी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सुशांतच्या या यशाबद्द्द्ल रयत शिक्षण संस्थेतील अनेक अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, समता प्रतिष्ठान सेवा भावी संस्था मळोली चे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ तसेच जयसिंगराव करपे विद्यालयाचा स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.