जे. एम. म्हात्रे कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी गावाचे युवा नेते उमेश भाकरे व ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयाचे मोमीन भाऊसाहेब यांना निवदेन देण्यात आले.
सध्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग 965 चे काम अंतिम टप्प्यात असून या रोडवरील शासनाच्या नियमानुसार रस्त्यावरती ज्या रंगरंगोटी (पांढऱ्या पट्ट्या झेबरा क्रॉसिंग) मारल्या नाहीत. तसेच रस्त्यावर दगड ठेवल्याने एका युवकाचा अपघात झाला असून त्याची घरची परिस्थिती नाजूक आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
तसेच या युवकालाही यांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अपघातग्रस्त युवकाला नुकसानभरपाई देण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्याचे काम सुरू करू न देण्याचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैय्या बोरकर, चेअरमन प्रशांत काळे, विकास इंगळे, दादासाहेब काळे, विलास काळे, विकास काळे, विजय वाघबंरे आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Fantastic site. Lots of helpful information here. I am sending it to some friends free brazzers videos https://brazzers.pw/