जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार…
मळोली येथील श्रीमती देवई गणपत कदम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन..
मळोली (बारामती झटका)
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे मळोली-तांदुळवाडी-शेंडेचिंच रोड, गणेश मंदिर शेजारी, कदम पाटील यांच्या निवासस्थानी सोमवार दि. 09/12/2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये श्रीमती देवई गणपत कदम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे रामचंद्र गणपत कदम पाटील, बाळासाहेब गणपत कदम पाटील, बाबुराव गणपत कदम पाटील, इंदुबाई तुकाराम माने आणि समस्त कदम पाटील परिवार मळोली, तांदुळवाडी, घुमेरा वेळापूर यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Remarkable! Its in fzct amazing paragraph, I have got much clearr idea abvout from this article.