जिजामाता शैक्षणिक संकुलात रमले चिमुकले

सराटी (बारामती झटका)
जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटीचे जिजामाता प्राथमिक विद्यालय व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, सराटी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील शाळेचा पहिला दिवस असल्याने चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी व आनंदात शिक्षण घ्यावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. मच्छिंद्र वीर यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळा व शिक्षणाविषयी भीती दूर करून विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले. जिजामाता प्राथमिक विद्यालय व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडावी म्हणून घोड्याच्या बग्गीतून विद्यार्थ्यांना मैदानावर फिरवून शैक्षणिक साहित्याचे वाटप जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश लिपारे, जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रकांत घोगरे, संस्थेचे पीआरओ प्रकाश जाधव, जिजामाता इंग्लिश मीडियम चे प्राचार्य जावेद मोगल, समुपदेशक सौ. हेमा फडे, ज्येष्ठ शिक्षक श्री. वैभव बोराटे, सौ. शुभांगी जाधव मॅडम, सौ. रामेश्वरी शिंदे मॅडम, शबाना मुजावर मॅडम, सौ. सुनीता कोकाटे, सौ. साधना पवार मॅडम, सौ. मनिषा ढवळे मॅडम, सौ. गायत्री चोरमागे मॅडम, सौ. रूपाली शिंदे मॅडम, सौ. भाग्यश्री घाडगे मॅडम तसेच स्वीय सहायक श्री. योगेश गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी श्री. संदीप शेळके, श्री. अवधूत मस्के, श्री. गुंडेराव त्रिगुळे, श्री. शिवाजी पोळ, श्री. राजू जाधव आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.