जिजामाता शैक्षणिक संकुलात बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-12-at-11.27.57-AM-780x470.jpeg)
सराटी (बारामती झटका)
बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनो सकारात्मक विचार करा, प्रेरित रहा व तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा, अशा शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी स्वागत केले.
जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सराटी या ठिकाणी बारावी बोर्डाचे परीक्षा केंद्र असून 397 विद्यार्थी आहेत. या केंद्रामध्ये आजपासून परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या स्वागतावेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र वीर, जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रकांत घोगरे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश लिपारे, शिवाजी विद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख प्रकाश घोगरे, प्रा. मल्हारी मगर, प्रा. अरुण जाधव, राहुल आसबे, प्रा. श्रीशैल सबसगी, जिजामाता महाविद्यालयाचे आयक्यूएससी समन्वयक प्रा. विजय गेंड, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मयूर पिसे, प्रा. तृप्ती झगडे, प्रा. कल्याणी बोडके, प्रा. तृप्ती चव्हाण तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. योगेश गायकवाड, श्री. गुंडेराव त्रिगुळे, सुवर्णा ढोले, वैशाली भोसले आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.