ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

जिजामाता महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न

सराटी (बारामती झटका)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व जिजामाता महाविद्यालय, सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेसाठी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी शुभेच्छा दिल्या.

विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. श्री. विजय काकडे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी गझल, गप्पा, गाणी या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रा. मुबीन तांबोळी यांनी ‘झेप घे रे पाखरा..’ या विषयावर मत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना करियर कसे घडवावे, विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षण व समाज यांचा मेळ घालून स्वतःचे व्यक्तिमत्व उजाळून घ्यावे, असे प्रतिपादन व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना केले.

व्याख्याते प्रा. मारुती करंडे यांनी ‘हसत खेळत माणूस बनुया’ या विषयावरती व्याख्यान दिले. सध्याच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती ताणतणावामध्ये असून हास्य हेच त्यातून मुक्त करू शकते, असे मत व्यक्त केले.

या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र वीर सर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेमधील व्याख्यानांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, कारण विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व वैचारिक प्रगती होण्यासाठी अशा व्याख्यानमालेची गरज आहे, असे विचार व्यक्त केले.
जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ‌. अविनाश लिपारे यांनी मनोगत व्यक्त करताना, महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी या पुढील काळामध्येही अशा व्याख्यानमालांचे आयोजन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्राध्यापक विजय गेंड यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मयूर पिसे, प्रा. रमेश इंगळे, प्रा. अरुण जाधव, प्रा. मल्हारी मगर, प्रा. मुकुंद सोनवणे, प्रा. राहुल आसबे, प्रा. मुस्तफा सय्यद, प्रा. रोहित जरे, प्रा. संदीप निकम, प्रा. प्रीतम खांडेकर, प्रा. वैष्णवी देशमाने, प्रा. प्रतीक्षा चव्हाण, प्रा. रोहिणी अनपट, प्रा. रूपाली वाघमोडे, प्रा. प्रज्ञा गिरमे, प्रा. ऋतुजा उबाळे, प्रा. स्नेहा पारेकर, प्रा. अरुणा कोकाटे, प्रा. तृप्ती झगडे, प्रा. शैला पवार, प्रा. कल्याणी बोडके, प्रा. शितल जगताप तसेच शिक्षकेतर कर्मचारी गुंडेराव त्रिगुळे, सुवर्णा ढोले, वैशाली भोसले उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी देशमाने, कु. सायली चंदनकर व कु. काजल कोकाटे यांनी केले तर आभार प्रा. ऋतुजा उबाळे यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button