ताज्या बातम्या

जिल्हा मध्यवर्ती बँकेत “वरमाई शिंदळ तर वराडाचं काय”, अशी अवस्था प्रशासक व अधिकाऱ्यांची झालेली आहे….

सीनियरिटी वगळून वरिष्ठ बँक इन्स्पेक्टर नेमणूक व सेवानिवृत्त फ्रॉड केलेले अधिकारी पुन्हा कामावर रुजू केले.

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासक आहे. बँकेच्या संचालक मंडळाने अनियमित कर्ज वाटप केलेले असल्याने त्यांच्यावर एकीकडे कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सहकारामध्ये पदाधिकारी असतील तरच अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने काम करतात मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक यांचा बेकायदेशीर व मनमानी कारभार सुरू आहे.

सीनियरिटी वगळून सीनियर बँक इन्स्पेक्टर एका आप्पाला केलेले असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरमाईचं शिंदळ तर वराडाचं काय, अशी अवस्था प्रशासक व अधिकाऱ्यांनी केलेली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आप्पा यांचा बोलबाला जोरात दिसत आहे. एक आप्पा अक्कलकोट दर्शनाला गेले तर दुसऱ्या आप्पाचे बेकायदेशीर सीनियर बँक इन्स्पेक्टर पदावर दर्शन दिसलेले आहे. प्रशासक जरी असले तरी त्यांच्यावर सहकार खात्याचा निर्बंध असतोच मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी व नेतृत्व यांच्या कृपाशीर्वादाने जिल्हा बँकेतील प्रशासक यांनी बेकायदेशीर सीनियर बँक इन्स्पेक्टर यांची नेमणूक करून अधिकाराचा गैरवापर केलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे विशेष लक्ष देऊन सुरुवात वरमाईपासून करावी, त्यामुळे बेकायदेशीर केलेली निवड रद्द करावी.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक असा ‘उत्तम” आहे ज्यांनी बँक इन्स्पेक्टर असताना फ्रॉड केलेला आहे. दि. 31/05/2024 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेतलेले आहे. याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक अनियमितता करण्यामध्ये जेवढे दोषी आहेत तेवढेच प्रशासनातील अधिकारी सुद्धा. आपले कोण वाकडे करीत नाही, अशा अविर्भावात असणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी अशी सभासद, शेतकरी, ठेवेदार यांच्याकडून मागणी होत आहे.

मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी,आकाशातील रंगीबेरंगी पतंगांप्रमाणे तुमचे हृदय आनंदाने उंच भरारी घेवो. जसजसा सूर्य उत्तर दिशेचा प्रवास सुरू करतो तसतसे तुमचे जीवन सकारात्मकता,उबदारपणा आणि समृद्धीने भरले जावो. मकर संक्रांत २०२५ च्या शुभेच्छा! तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंददायी आणि उदंड मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💥

तिळगुळ घ्या..गोड गोड बोला..

श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील
संपादक बारामती झटका
वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल
मु.पो.मळोली ता माळशिरस जि. सोलापूर 9850104914

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button