जिल्हा नियोजन समिती, कार्यकारी समिती व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्ती रद्द…
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 30 तारखेला बैठक होण्याची शक्यता मात्र, जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित राहू शकणार नाहीत..
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन नियोजन विभागा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कार्यकारी समिती वरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्ती शासनाकडून रद्द करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव सुषमा विवेक कांबळी यांनी शासन निर्णयाअन्वये सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांना प्रति पाठविण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक – जिनियो – 2025/ प्र. क्र.14 का/ 1481 – अ मंत्रालय मुंबई दि. 28 जानेवारी 2025 शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे सुधारणा) अधिनियम 2000 मधील कलम 3(3) दोन ब व क आणि कलम -3 (3)(चार) फ मधील तरतुदी नुसार राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) सुधारणा नियम 2018 च्या अधिसूचनेतील परिच्छेद 7 (मूळ अधिनियमाचा नियम 6अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या या शासन निर्णयाने त्वरित प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.
सर्व जिल्हाधिकारी, तथा सदस्य, सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी उपरोक्त आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावेत, असा महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय केलेला असल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्य यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक 30 जानेवारी 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. सदरच्या बैठकीला जिल्हा नियोजन समिती सदस्य यांना उपस्थित राहता येणार नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.