जिल्हा परिषदेमध्ये जिजाऊ सावित्रीच्या लेकींचा कर्तृत्ववान महिला म्हणून होणार सन्मान

सोलापूर (बारामती झटका)
मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त दि. 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे मा. मुख्य कार्यकारी श्री. कुलदीप जंगम यांचे शुभहस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक श्री. चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.), श्रीमती स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती मिनाक्षी वाकडे यांचे प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष उपस्थितीत जिल्हा परिषदेत जिजाऊ सावित्रीच्या लेकिंचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान करण्यांत येणार आहे. असे मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी सांगीतले. त्यात प्रामुख्याने मालती नंदकुमार कोहिणकर, उषा उत्तमराव जगताप, छाया महादेव पाटील, वनमाला महादेव भुजबळ, माया चंद्रहार जाधव, मंगला यशवंत मिरकले, कल्पना तानाजी वाकडे, सुदामती नागनाथ जगताप, प्रभावती गोविंद नवले, नंदाबाई शिवाजी हावळे, कलावती भरत धनशेट्टी, बायडाबाई सुभाष कवितके, सविता तानाजी कदम, वनिता विजय जमदाडे, चंद्रभागा भगवान पांढरे, कुसूम जनार्दन कुलकर्णी, लियाकत नैनुद्दीन शेख, सुनिता बापूराव राऊत यांचा सन्मान करण्यांत येणार आहे.
तसेच सकाळी 10 ते 5 वाजेपर्यत रक्तदान शिबीराचे पण आयोजन केले आहे.

याप्रसंगी अनिल जगताप, सचिन साळुंखे, सुर्यकांत मोहिते, सुहास चेळेकर, आप्पासाहेब भोसल, सचिन चव्हाण, चेतन भोसले, विकास भांगे, रोहीत घुले, रणजित गव्हाणे. संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, सुधाकर माने देशमुख, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, त्रषिकेष जाधव, जयंत पाटील आदि उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



