जिल्हा परिषदेसाठी ३१, तर पंचायत समितीसाठी १९ अर्ज दाखल

इच्छुकांची गर्दी, एकूण ५३१ उमेदवारी अर्जाची विक्री
सोलापूर (बारामती झटका) लोकमत साभार
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढू लागली आहे. सोमवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी २४३, तर पंचायत समितीसाठी २८८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद गटातून ३१, तर पंचायत समिती गणातून १९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण ५० अर्ज प्राप्त झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहेत.
सोमवार, १९ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी ७६, तर पंचायत समितीसाठी १३६ अर्जाची विक्री झाली. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी १२, तर पंचायत समितीसाठी ५ असे एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील ६८ जिल्हा परिषद गट व १३६ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी असून २२ जानेवारीला अर्जाची छाननी केली जाणार आहे. २३ ते २७ जानेवारीदरम्यान अर्ज मागे घेता येणार असून २७ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. ५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



