ताज्या बातम्यासामाजिक

जिल्हा प्रशासनाला काम चालू न केल्यास लवंग ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

लवंग (बारामती झटका)

25/4 लवंग, ता. माळशिरस रस्त्याचे काम चालू करण्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला काम चालू न केल्यास 15 ऑगस्ट रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदन देऊन देण्यात आला आहे. २५/४, लवंग रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला असून टेंडर व वर्क ऑर्डर झालेली असताना काम बंद असून सदर काम चालू होणेबाबत निवेदन देण्यात आले आहे. अतिशय खराब अवस्थेमुळे खूप दिवसापासून वर्क ऑर्डर होऊन रस्त्याचे काम बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आम्ही सर्व लवंग गावचे कायमस्वरूपी रहिवाशी असून गावची सध्याची लोकसंख्या हि ७००० पेक्षा जास्त असून गावाला जोडला जाणारा २५/४, लवंग हा मुख्य रस्ता आहे. सदरचा रस्ता हा गेली २० वर्षांपासून नादुरुस्त असून या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५ कोटी ७० लाख एवढी रक्कम मंजूर झालेली असून सदरच्या रस्त्याचे ईस्टीमेट, टेंडर आणि वर्क ऑर्डर झालेली असून सदरचा ठेकेदार हा गावातील नागरिकांना शासनाकडे पैसे उपलब्ध नाहीत असे सांगून काम चालू करत नाही.

लवंग गावामध्ये विद्यार्थी, अपंग व नागरिक हे एस. टी. ने रोज प्रवास करत आहेत. तरी, रस्ता खराब असल्यामुळे रस्त्याअभावी एस. टी. बंद होऊन विद्यार्थ्यांची, अपंग व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होईल. तसेच लवंग गावामध्ये ७ गावांचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णांचे येणे-जाणे असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

तसेच सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे, किंवा ठेकेदारास काम करायचे नसल्यास टेंडर RECALL करण्यात यावे, सदरचा रस्ता दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत चालू न झाल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषण करू, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी यशवंत वाघ, अंकुश काका वाघ, प्रदीप कदम, धनाजी वाघ, हर्षवर्धन पाटील, राहुल टिक, घमन चव्हाण, हनुमंत भोसले, नानासाहेब आवताडे, दत्तात्रय चव्हाण, तानाजी चौगुले, मोहन कांबळे हे लवंग गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom