जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा गुरूवारी जाहीर नागरी सत्कार…
करमाळा (बारामती झटका)
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात गुरुवार दि. ६ व ७ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यानुसार करमाळा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने बुधवारी व गुरुवारी हरीकिर्तनासह गुरुवारी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर आणि चष्मे वाटप होणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या वाढदिवस सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. ६ मार्च २०२४ सायंकाळी ७ ते १० ह.भ.प. योगिताताई डोंबाळे (डोंबाळवाडीकर) यांच्या हरीकिर्तनाने होणार असून वाढदिवसादिवशी म्हणजेच गुरुवार दि. ७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वा. माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी (बापू) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे (OSD मुख्यमंत्री कार्यालय), उद्योजक श्रीकांत पवार (मुंबई), उद्योजक पंढरीनाथ साटपे (मुंबई), उद्योजक रामभाऊ पवार (पुणे), राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन राणा दादा सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत, शिवसेना माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, भाजपा जिल्हाप्रमुख केदार सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे, संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख चरण चवरे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजप नेते विलासराव घुमरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, करमाळा नगरपालीकेचे माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बाजीराव चव्हाण (बीड), युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, मोहोळचे शिवसेना नेते राजू खरे, आंबेगाव खुर्द चे मा. सरपंच गणेश वनशीव, थेऊर चे मा. सरपंच युवराज काकडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती बसवंती आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सत्कार सोहळ्यानंतर आरोग्य आणि रक्तदान शिबिराला सुरुवात होणार असून हे शिबिर सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. वाढदिवसानिमित्त दुपारी १ ते ४ स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सत्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करमाळा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I enjoyed the humor in this article! For more, click here: LEARN MORE. Let’s discuss!
This was both informative and hilarious! For further reading, check out: LEARN MORE. What do others think?