जिल्हा परिषदेच्या ९ अधिकाऱ्यांची होणार बदली ?

सोलापूर (बारामती झटका)
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात गट अ मधील पाच तर गट ब मधील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गट अ मधील स्वच्छता पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे व माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश सुळे.
गट ब मधील सहाय्यक गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती किरण मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंढरपूर राजाराम भोंग, सहाय्यक गटविकास अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद मुख्यालय महेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सनियंत्रण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रतिलाल साळुंखे यांचा समावेश आहे.

यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत कार्यरत असणाऱ्या असणाऱ्या स्वजिल्ह्यातील अधिकाऱ्यांची माहिती शासनाच्या वतीने मागविण्यात आली होती. ती माहिती सोलापूर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शासनाला देण्यात आल्याचे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.