जीवनदायी पालेभाजी अळू
माळशिरस (बारामती झटका)
अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. तासेच अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्सलेट असते तर, अशा या बहुगुणी अळू खाण्याचे काय काय फायदे आहेत ते पाहूयात…
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चोथा थापावा व पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी.
अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. हे शरीरात इन्सुलिन आणि ग्लूकोज सोडते. यामुळे ग्लायसेमिक पातळी देखील राखली जाऊ शकते. मधुमेह कमी होण्यास मदत होते. अळूच्या पानामध्ये कॅलरी कमी असतात. जे वजन कमी करण्यास मदत करते. अळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते. अळूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हाडे मजबूत करते. अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामध्ये उपस्थित व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. हे कर्करोग आणि हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध करते.
तसेच जर अळूची कच्ची पाने खाल्ली तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून, ते शिजवून खाणे. अळूची कच्ची पाने खाल्ल्याने घशात जळजळ होऊ शकते. दमा असलेल्या लोकांनी अळूच्या पानांचे सेवन करू नये. ज्या लोकांना गुडघा दुखणे आणि खोकल्याची समस्या उद्भवते. त्यांनी देखील अळूची पाने खाणे टाळावे. ज्या लोकांना गॅसची समस्या आहे. अशांनी अळूची पाने खाणे टाळावे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Ищите в гугле