जुन्या रिती-रिवाजांना फाटा देत केले अस्थिविसर्जन….

वाघोली (बारामती झटका)
दि. १९ फेब्रुवारी रोजी वाघोली ता. माळशिरस, येथील पैलवान विजय (बापू) माने शेंडगे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. आज शुक्रवार दि. २१ रोजी अस्थि विसर्जनाच्या वेळी अस्थि नदीच्या पाण्यात विसर्जित न करता त्या अस्थि कै. विजयबापू माने शेंडगे यांच्या घराच्या भोवताली असणाऱ्या शेतजमिनीत वृक्षारोपण करून त्या वृक्षारोपणावेळी त्या अस्थि विसर्जित करण्यात आल्या.
सदरच्या उपक्रमाबद्दल जाणकार व्यक्ती व आलेल्या ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. विजय (बापू) माने शेंडगे यांच्या परिवाराच्या वतीने कै. विजय (बापू) यांच्या आठवणी आमच्या कुटुंबाच्या स्मरणात राहाव्यात म्हणून व त्यांचा आदर्श कुटुंबाच्या डोळ्यासमोर राहावा म्हणून त्यांच्या अस्थि नदीच्या पाण्यात विसर्जित न करता त्यांच्या आठवणीसाठी घराच्या बाजूने वृक्षारोपण करून त्यात अस्थि विसर्जित करण्यात आले असल्याचे सांगितले. सदरचे वृक्षारोपण हे विजय (बापू) यांच्या पत्नी श्रीमती भाग्यश्री, भाऊ गणेश, आई पुष्पलता तसेच सूत गिरणी संचालक मोहन शेंडगे, मराठा सेवा संघांचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे व कुटुंबातील सदस्य यांचे हस्ते करण्यात आले.
अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वंदनेने करून कै. विजय (बापू) माने शेंडगे यांना तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश पवार, संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी आपल्या मनोगतातून श्रद्धांजली वाहिली. व उपस्थित ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहून कै. विजयबापू माने शेंडगे यांच्या अस्थीचे वृक्षारोपण करून विसर्जन करण्यात आले. तसेच जुन्या परंपरांना फाटा देत उर्वरित विधी हे सातव्या दिवशी करण्याचे कुटुंबाने या ठिकाणी जाहीर केले. सदर उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.