के. पी. पॅरामेडिकल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांचा प्रोफेशनल आयकॉन अवॉर्ड ने सन्मान..

पुणे (बारामती झटका)
के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिटयूट ही संस्था गेली 10 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. इतक्या कमी कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम हे अतिशय उल्लेखनीय आहे, या कार्याची दखल प्रसिद्ध व एक नंबरचे दैनिक लोकमत वृत्तपत्र यांनी घेतली. शाबासकीची थाप ही पुरस्कारच्या रूपात देऊन गौरव केला. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांना 29 जुलै २०२४ रोजी ह्या वर्षीचा लोकमत Professional Icon Award 2024 हा पंचतारांकित हॉटेल JW Marriott पुणे येथे देण्यात आला.


यावेळी मनोगत व्यक्त करताना के. पी. पॅरामेडिकल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर म्हणाले कि, माझ्या आयुष्यातील कालचा दिवस म्हणजे एक सुवर्णदिन आहे. असे म्हणून कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी लोकमतचे मुख्य संपादक संजय आवटे सर, सिबायोसिस युनिव्हर्सिटीचे संस्थापक पद्मभूषण डॉ. स. ब. मुजुमदार सर, सिनेअभिनेता चंकी पांडे, सिनेअभिनेता/दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध विधीतज्ञ ॲड. हर्षद निंबाळकर, शास्त्रीय गायिका प्रियांका बर्वे व प्रसिद्ध बिल्डर कैलास मुंदडा आदी मान्यवरच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.