ताज्या बातम्याशैक्षणिक
कदमवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्गठन बैठक संपन्न
कदमवाडी (बारामती झटका)
कदमवाडी ता. माळशिरस येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्गठन बैठक दि. २३/१२/२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी पालकांमधून बारा सदस्य निवडण्यात आले. बिगर मागास आठ, इतर मागास एक, भटक्या जाती एक आणि मागासवर्गीय दोन असे सदस्य निवडण्यात आले. सदर बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री. देविदास महादेव कदम व उपाध्यक्ष म्हणून सौ. राधिका आजिनाथ कदम यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे केंद्रप्रमुख श्री. पोतलकर सर व मुख्याध्यापक श्री. कुंभार सर यांनी स्वागत केले. ही निवड खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध पार पडली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.