कै. विष्णुपंत कुलकर्णी (अण्णाकाका) यांचे पुण्यस्मरण विविध सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था, विष्णुपंत कुलकर्णी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, माळशिरस, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, रामदेव व मारुती देवस्थान, हनुमान मोफत वाचनालय यांच्या वतीने आज सोमवार दि. २४. जून २०२४ रोजी कै. विष्णुपंत कुलकर्णी (अण्णाकाका) यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. मिलिंद कुलकर्णी, नगराध्यक्षा ताई सचिन वावरे, रामचंद्र दोशी, धनंजय मस्के, मुकुंद पंचवाघ, संतोष कुलकर्णी, रामचंद्र सिद, सुभाष शिंदे, धोंडीराम मस्के, संदीप पाटील, अजित गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
कै. विष्णुपंत कुलकर्णी (अण्णाकाका) यांचे पुण्यस्मरणानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, आयुर्वेद व रोग निदान शिबिर, कान व श्रवणदोष, दंतचिकित्सा, हृदयरोग व रक्तदाब चिकित्सा माधवबाग, रक्त तपासणी, किशोरवयीन मुलींची एचबी तपासणी असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. माधव मिरासदार अध्यक्ष, श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था, माळशिरस यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १७० जणांनी रक्तदान केले तर या रक्तदान शिबिरास शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, अकलूज यांचे सहकार्य लाभले. तसेच नेत्रतज्ञ डॉ. आप्पासाहेब टेळे यांनी नेत्रचिकित्सा योजनेअंतर्गत 134 रुग्णांची तपासणी केली. डॉ. अशोक बागनवर व सौ. मनीषा बागनवर यांनी ४३ रुग्णांची दंतचिकित्सा केली. त्याचबरोबर डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. वरूण कुलकर्णी, सौ. रेणुका कुलकर्णी, सौ. त्रिवेणी कुलकर्णी यांनी आयुर्वेद चिकित्सा व रोग निदान शिबिरामध्ये १२७ रुग्णांची तपासणी केली. डॉ. किशोर बागडे यांनी ५४ रुग्णांचे कान व श्रवणदोष तपासणी केली. त्याचबरोबर डॉ. अभिजीत मगर आणि डॉ. किशोर गोरड यांनी ७४ रुग्णांची हृदयरोग व रक्तदाब तपासणी केली. तसेच यावेळी २०१ किशोरवयीन मुलींची एचबी तपासणी केली. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्या शिबिरात डॉ. मयुरा काळे यांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. आर. केसकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. अपर्णा इनामदार यांनी मानले. तर या कार्यक्रमाचे समन्वयक राहुल राजमाने सर हे होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great read! I tried a similar approach and found it very effective. Your article reinforced my experience.
GraphPad Prism Serial Number 2024