डॉ. ज्ञानदेव जगन्नाथ ढोबळे यांना २०२४ चा “होलार समाज भूषण पुरस्कार” प्रदान

माळशिरस (बारामती झटका)
दिनांक – ०९/०६/२०२४ रोजी अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माळशिरस येथील संत सावता माळी कार्यालयात आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रत्येक वर्षी अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुका यांच्या वतीने “होलार समाज भुषण पुरस्कार २०२४” हा पुरस्कार समाजाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिला दिला जातो. यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार सदाशिवनगरचे सुप्रसिद्ध डॉ. ज्ञानदेव जगन्नाथ ढोबळे (एमबीबीएस डि. ए.) यांना हा पुरस्कार अकलूजचे डीवायएसपी नारायण देवदास शिरगावकर, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरणजी जावीर साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुका यांच्या वतीने माळशिरस तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. यामध्ये माळशिरस तालुक्यातील दहावी, बारावी, पदवीधर, सेट, नेट, वकील, डॉक्टर आदींचा मान-सन्मान या निमित्ताने केला जातो.
गेली २७ वर्षे माळशिरस तालुक्यामध्ये अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जातो. यासाठी आजपर्यंत अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब, माजी शिक्षण विभाग प्रमुख हनुमंत शेलार सर, सध्याचे शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळीग सर व त्यांचे सर्व सहकारी यांनी बहुमूल्य वेळ दिला आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नेते चंद्रकांत गुळीग गुरूजी, बाजीराव केंगार, हैदरजी केंगार, माणिकराव भंडगे, पांडुरंग आयवळे, रणजित आयवळे, दत्तात्रय कांबळे, किसनराव ढोबळे गुरूजी, सुनील ढोबळे, बापुदादा ढोबळे, दिनेश जावीर, बापुराव आयवळे, प्रितम माने, सि. डी. ढोबळे सर, ब्रम्हदेव केंगार महाराज, हनुमंत बिरलिंगे, दत्तात्रय कांबळे पाटील, गणेश केंगार, लालासाहेब केंगार, आनंद आयवळे, डॉ. संजय हेगडे, पांडुरंग नामदास,आदी समाज बांधव उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.