कमलादेवी ब्लड बँकेला पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांची भेट
करमाळा (बारामती झटका)
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आपल्या जन्मभूमीत आपल्या जन्मभूमीची सेवा करण्याच्या हेतूने स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू केलेली कमलादेवी ब्लड बँक उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.
यावेळी चिवटे हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक दिपक पाटणे यांनी डॉ. लहाने यांचे स्वागत केले. तर, हॉस्पिटलचे चेअरमन महेश चिवटे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना डॉ. लहाने म्हणाले की, ग्रामीण भागात ब्लड बँक उभा करणे तसे अवघड काम आहे. मात्र, मंगेश चिवटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही ब्लड बँक उभा करून या भागातील रुग्णांना आपल्या भागातच रक्त उपलब्ध करून देण्याचे मोठे काम केले आहे. यापुढील काळात मंगेश चिवटे यांनी एक मोठे हॉस्पिटल उभा करून करमाळा तालुक्यातील जनतेची रुग्ण सेवा करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मंगेश चिवटे यांचा आणि माझा 15-20 वर्षापासून संबंध असून अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात.
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून गेल्या एक वर्षात जवळपास सव्वाशे कोटी रुपयांची मदत रुग्णांना करून मंगेश चिवटे यांनी एक विक्रम निर्माण झाला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..
Very well written! The insights provided are very valuable. For additional information, check out: LEARN MORE. Looking forward to the discussion!