कण्हेर गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी राजाभाऊ दादासो माने यांची बिनविरोध निवड.

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच बाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली.
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांचे कट्टर समर्थक निष्ठावान राजाभाऊ दादासो माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच बाजीराव महादेव माने यांच्या अध्यक्षतेखाली दि. 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरच्या ग्रामसभेत राजाभाऊ दादासो माने यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी विद्यमान उपसरपंच नारायण कुंभार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, माजी सरपंच भरतबापू माने, यशवंत माने ज्येष्ठ नेते, हनुमंतराव काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव ठवरे, सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव माने सर, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब चव्हाण, सुहास माने, महादेव माने, प्रताप माने, प्रज्योत माने, प्रथमेश माने, शुभम माने, विलास माने, मारुती माने, तानाजी सरगर, दत्तात्रय महानवर, पोपटराव माने, विजय शेंडगे, विठ्ठल शिंदे, जगन्नाथ शिंदे, पांडुरंग शिंदे, भिमराव माने सर, हरिदास मडवलकर सर, कैलास काळे, बापूराव देवकाते, सागर बोडरे, खाशाबा बुधावले, अनिल केंगार यांच्यासह ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.