कण्हेर जिल्हा परिषद गटात पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान होणार – युवा नेते धर्मराज माने.
माढा लोकसभेचे प्रभारी आ. प्रसाद लाड यांचे नियोजन, लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा विकास, डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची मोलाची साथ मिळाल्याने मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला – कण्हेर जिल्हा परिषद गटाचे विकासप्रिय नेतृत्व युवानेते धर्मराज माने.
कण्हेर (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाच्या माळशिरस विधानसभेच्या बहुचर्चित कण्हेर जिल्हा परिषद गटात माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान होईल, असा आत्मविश्वास कण्हेर जिल्हा परिषद गटाचे विकासप्रिय नेतृत्व युवा नेते धर्मराज माने यांनी बारामती झटकाशी बोलताना व्यक्त केला.
माढा लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी योग्य नियोजन केलेले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार व सोलापूर लोकसभेचे भावी खासदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये केलेली विकासकामे, आमदार राम सातपुते यांचा विकास व भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची मोलाची साथ मिळाल्याने मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. राजकीय दबाव असताना सुद्धा लोकांनी महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना कण्हेर जिल्हा परिषद गटातील इस्लामपूर व माणकी मराठा समाजाचे प्राबल्य असलेली दोन गावे वगळता इतर गावांमध्ये मतदान अपेक्षेपेक्षा जास्त होणार आहे. तर जळभावी, रेडे व भांब या तिन्ही गावांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा महायुतीचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक तरी जास्त मत मिळेल, असा विश्वास कण्हेर जिल्हा परिषद गटाचे विकासप्रिय नेतृत्व युवा नेते धर्मराज माने यांनी निवडणुकीनंतर बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले.
धर्मराज उर्फ धर्मा माने सोशल मीडियावर कसे फेमस झाले….
माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने यांची ओळख धर्मा या नावाने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावर साता समुद्रापलीकडे निर्माण केलेली होती. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार विकास कामांमुळे कण्हेर गावचे युवा नेते धर्मा माने यांनी माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील यांचे 100% कार्यकर्ते असणारे अनेक आहेत. पहिल्यांदा दरवाजा उघडण्याच काम धर्मा माने यांनी केलेले असून मतदानाच्या पेटीतून अनेक धर्मा माने तयार होणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रसाद लाड यांनी मोहिते पाटील यांचा 100% कार्यकर्ता असणाऱ्या धर्मा माने यांनी बंडाची भूमिका घेतल्याने कौतुक करून भेट घेऊन धन्यता मानतो, अशा पद्धतीने गौरवोद्गार करून शाबासकीची थाप पाठीवर मारलेली होती
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना महायुतीची सोलापूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करून माळशिरस तालुक्यात केलेल्या विकास कार्यातून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचे सांगून मतदार संघात केलेल्या विकासकार्याचा पाढा वाचत असताना अनेकांची अडचणीची व कधीच न झालेली कामे केलेली असल्याने अधिकाराने आमदार राम सातपुते उपस्थित कार्यकर्त्यांना बोलत होते. त्यामध्ये मोहिते पाटील यांचा 100% असणारा कार्यकर्ता कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने यांच्याकडे आमदार यांची नजर गेल्यानंतर ‘ये धर्मा’ असा उल्लेख करून मतदान किती करणार, विकासकामे केलेली आहेत, मतदान जास्त झाले पाहिजे, असे अधिकार वाणीने सांगितलेले होते.
त्यावेळेला सोलापूर येथील विरोधी उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आपल्या फेसबुक व इन्स्टावर ‘ए धर्मा’ असे वाक्य टाकून धर्मा सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला होता. तालुक्यातील मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक यांनी सुद्धा सदरची पोस्ट फिरवलेली होती. धर्मा माने यांना आमदार राम सातपुते यांच्या विरोधात मुलाखत देण्यासाठी अनेकांनी विनवण्या केल्या. मात्र, धर्मा माने यांनी जुनी मैत्री जपली. राम सातपुते आमदार होण्याअगोदर एकत्र वावरत होते. एकाच ताटामध्ये जेवण केलेले असे जिवाभावाचे मित्र होते. मैत्रीसाठी 100% मोहिते पाटलांचा असणारा कार्यकर्ता युवानेते धर्मराज माने यांनी आमदार राम सातपुते यांच्या सोबत राहून भारतीय जनता पक्षाचे कमळ हातात घेतलेले होते. याचे कौतुक माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी केलेले होते. निवडणुकीनंतर कण्हेर जिल्हा परिषद गटाकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारतीय जनता पक्षाला एकाही गावामध्ये मताधिक्य मिळणार नाही, असे बोलले जात असताना युवा नेते धर्मराज माने यांनी धक्कादायक माहिती दिलेली असल्याने पुन्हा एकदा धर्मा माने सोशल मीडियावर चर्चेत येणार आहेत. चार तारखेला मतमोजणी आहे, त्यावेळेस खरे चित्र स्पष्ट होईल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
payday loan
buy viagra online