कण्हेर येथील थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार बाजीराव माने पाटील यांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल..
कण्हेरसिद्ध ग्रामविकास पॅनल प्रमुख व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या नियोजनात सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार यांचे उत्साहात अर्ज दाखल करण्यात आले.
माळशिरस (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस, गावच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व कण्हेरसिध्द ग्रामविकास पॅनल प्रमुख गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या नियोजनात थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार बाजीराव माने पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांचे उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन व उत्साही वातावरणात तहसील कार्यालय माळशिरस येथे निवडणूक अधिकारी श्री. एस. के. खंडागळे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे स्विकारली.
कण्हेर गावचे ग्रामदैवत कण्हेरसिद्धनाथाला श्रीफळ वाढवून फटाक्यांच्या आतिषबाजीत हलग्यांच्या कडकडाटात वाजत गाजत मोटारसायकल रॅली व चारचाकी वाहने यांची भव्यदिव्य मिरवणूक वाजत गाजत कण्हेर, इस्लामपूर, गारवाड पाटी, गोरडवाडी मार्गे माळशिरस पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून माळशिरस शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वाजत गाजत तहसील कार्यालयाकडे रॅलीमधून सर्व उमेदवार नेते व कार्यकर्ते गेले होते. सर्व वाहने सर्टिफाईड ग्राउंडवर पार्किंग करून तहसील कार्यालयाकडे पायी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यात आले.
थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार बाजीराव महादेव माने पाटील, वार्ड क्र. १ श्री. विठ्ठल शंकर शिंदे, सौ. सुवर्णा विजय शेंडगे, सौ. अक्काताई भीमराव काळे, वार्ड क्र. २ चिरंजीव प्रथमेश सुभाष माने, श्री. दादासाहेब पांडुरंग चव्हाण, सौ. मंगल सुहास माने, वार्ड क्र. ३ श्री. अशोक हावसराव माने, सौ. वर्षाराणी कुंडलिक काळे, वार्ड क्र. ४ श्री. दादासाहेब सदाशिव माने, सौ. अनिता बापू देवकते, वार्ड क्र. ५ नारायण अण्णा कुंभार, सौ. हिराबाई महादेव केंगार, सौ. मनीषा सागर बोडरे असे १४ उमेदवारी अर्ज भरले असून पूरक १४ अर्ज भरलेले आहेत. नेते व कार्यकर्ते यांच्यामधून आनंद व जल्लोष दिसून येत होता. सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार सर्वांनी केलेला आहे
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..