कन्हेरगांव जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक बगाडे, उरमोडे व कुबेर यांचा सत्कार.

कन्हेरगांव (बारामती झटका)
कन्हेरगांव ता. माढा, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोरकुमार बगाडे, दिनेश उरमोडे व शिवदास कुबेर यांची बदली झाल्याने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात
मुख्याध्यापक किशोरकुमार बगाडे, शिक्षक दिनेश उरमोडे, शिक्षक शिवदास कुबेर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरचा निरोप समारंभ कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कन्हेरगांव ता. माढा येथे बुधवार दि. ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे, सरपंच श्रीकांत बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कोळी, रतिलाल केदार, सामाजिक कार्यकर्ते भारत लोखंडे, प्रमोद शिंदे, जोतीराम केदार, नागनाथ शिंदे, सतिश शहापुरे, शिवकन्या खोचरे, इंदुमती गायकवाड, सविता साळुंखे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नागनाथ शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद शिंदे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.