ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका विद्यार्थ्याचे घवघवीत यश…

बचेरी येथील शेतकरी कुटुंबातील श्री. राहुल मच्छिंद्र थिटे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड…

माळशिरस (बारामती झटका)

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका माळशिरस शाखेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केलेले आहे.
बचेरी ता. माळशिरस, येथील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील श्री. राहुल मच्छिंद्र थिटे या विद्यार्थ्याची विक्रीकर निरीक्षक पदी झालेली आहे.

श्री. राहुल मच्छिंद्र थिटे यांचे प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बचेरी येथे सहावीपर्यंत प्राथमिक शिक्षण झालेले आहे. तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पिलीव आणि उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स देवापुर, ता. माण, जि. सातारा येथे पूर्ण झाले. BE mech या पदवीचे शिक्षण पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव, जि. सांगली, येथे पूर्ण झाले.

ME mech पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2023 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून तलाठी भरतीमध्ये तलाठी म्हणून निवड झाली. ते सध्या माळशिरस येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशामध्ये माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पोलीस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे पाटील, अध्यक्ष पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, सचिव ग्रामविकास अधिकारी हनुमंतराव वगरे यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे व इतर अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे.

आई-वडिलांनी विश्वास ठेवून मुलाला शिक्षण दिलेले होते. या विश्वासाला आपला मुलगा सार्थ ठरल्याने परिवाराला मोठा आनंद झालेला आहे. त्यांच्या दोन बहिणी व एक भाऊ यांचंही या यशामध्ये खूप मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
01:24