कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी वेळेवर करणे व विमा वेळेवर उत्तरविणे ही बाब महत्त्वपूर्ण आहे – डॉ. एम. के. इनामदार
श्रीपूर (बारामती झटका)
आज श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयीन सुधारणा या १०० दिवसीय कार्य मोहिमेअंतर्गत कार्यालयीन कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास सुप्रसिद्ध डॉ. श्री. एम. के. इनामदार साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. निनाद फडे फिजिशियन, डॉ. शैलेश गायकवाड फिजिशियन, डॉ. निखिल आर्वे मधुमेह तज्ञ, डॉ. सुरज पवार त्वचारोग तज्ञ, डॉ. विश्वास कदम अस्थिरोग तज्ञ आदी मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी डॉ. इनामदार यांनी, सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर आरोग्याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असून याच सोबतीला विम्याचे कवच घेणे ही आवश्यक असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी अनेक किस्से सांगितले,
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी खुणूसदारपणे आपले भाषण करून यामधून कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व व यामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यकालीन अडचणी याबाबत अतिशय चांगले मार्गदर्शन केले. आजच्या या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी सहभागी घेतला असून यामधून त्यांच्या आरोग्याची तपासणी, इसीजी, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण तपासणी संपन्न झाल्या. यामधून कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याबाबत सध्याच्या असणाऱ्या अडचणी व त्यावर औषध उपचार याबाबत उपस्थित मान्यवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावना केली. कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी श्री. सुधीर पोपळे यांनी सूत्रसंचालन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.