कारुंडे येथील मोहन कापसे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्काराने सन्मानित
कारुंडे (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील रहिवासी श्री. मोहन तुकाराम कापसे यांना नुकताच दिल्ली येथे ग्लोबल फौंडेशन यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. मोहन तुकाराम कापसे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत व सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत ४० वर्षांपूर्वी गाव सोडून कलरचा व्यवसाय गुजरात येथे सुरू केले. हळूहळू त्यांनी विविध कंपनीचे कलरचे काम हाती घेतले. याच माध्यमातून पुणे येथे ही आपला व्यवसाय सुरू करून प्रगती केली. या कामातून मिळणाऱ्या काही रकमेतून त्यांनी गावातील विविध विकासकामास मदत, गरीब व गरजू मुलांना शालेय उच्च शिक्षणासाठी मदत व पीडित मुलामुलींचे लग्न कार्यासाठी मदतीचा हात देणारे मोहन कापसे.
श्री. मोहन तुकाराम कापसे यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतेच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कारुंडे गावचे माजी सरपंच अमर जगताप आदींनी त्यांना शुभेच्या दिल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.