ताज्या बातम्याराजकारण

कार्यक्रमाचे उद्घाटक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हीच सांगा हे बरं हाय का ??

कार्यक्रमाचे उद्घाटक, अध्यक्ष, आयोजक, निमंत्रक भारतीय जनता पक्षाचे असताना भाजपचे खासदार व जिल्हाध्यक्ष यांना वगळणे भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणात बसते का ?

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभ हस्ते व महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. 07/09/2023 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर ता. माळशिरस या साखर कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले आहे. सदरच्या कार्यक्रमाची उद्घाटन निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर आलेली आहे. सदरच्या पत्रिकेमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष आयोजक निमंत्रक भारतीय जनता पक्षाचे असताना भाजपचे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर जिल्हा ग्रामीणचे नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांची पत्रिकेतून नावे वगळलेली असल्याने भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणात बसते का ? असा भाजपसह इतर पक्षांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्हीच सांगा हे बरं हाय का ? असाही सवाल माढा लोकसभा मतदारसंघात निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक असल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यक्रम सार्वजनिक उद्घाटनाचा आहे. भव्य शेतकरी मेळाव्याचे सुद्धा आयोजन केलेले आहे. सदरच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये भाजपसह अनेक इतर पक्षातील आजी-माजी पदाधिकारी यांची नावे आहेत. खासदार व जिल्हा अध्यक्ष यांची नावे वगळलेली असल्याने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button