ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

“काय सांगताय” चक्क शिक्षकाने दिशाभूल करून दिव्यांग बांधवाची चार लाख रुपयांची फसवणूक केली !!

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील एका शिक्षकाने दिव्यांग बांधवाची नोकरी लावतो म्हणून दिशाभूल केली आणि गरीब परिस्थितीत दिव्यांग बांधवांच्या अडचणीमध्ये वाढ केलेली आहे. समाजामध्ये आदर्श शिक्षक आहेत, व्यावहारिक आहेत, अशा शिक्षिकेला काळीमा फासण्याचे काम एका शिक्षकाने केलेले आहे.

आई वडीलांच्या संस्कारानंतर शिक्षकांना आई-वडिलांसारखे गुरु मानले जाते. त्यामुळे शिक्षकांना समाजात आदर्श स्थान दिले जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. असाच विश्वास एका दिव्यांग बांधवांने शिक्षकावर ठेवला आणि शिक्षकाने विश्वासघात करून दिव्यांग बांधवाची दिशाभूल केलेली आहे.

दिव्यांग बांधवाचे उदरनिर्वाह करण्याकरता छोटेसे रिपेअर करण्याचे दुकान आहे. त्यामुळे परिसरातील आसपासच्या गावातील लोकांशी संपर्क येतो. असाच एका शिक्षकाचा संपर्क आला. बोलता बोलता त्यांनी माझा मुलगा मोठा ऑफिसर आहे असे सांगून नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. चक्क शिक्षक म्हणतायेत म्हणल्यावर अपंग व्यक्तींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. नोकरीच्या आशेपोटी उपासमारी करून साठवलेले पैसे व उसनवारी करून चार लाख रुपये शिक्षकाच्या हवाली केले. अनेक दिवस उलटून गेले तरी नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही. सुटणार तरी कसा, शिक्षकाचा मुलगा मोठा ऑफिसर नसावा‌ त्यामुळे प्रश्न प्रलंबित राहिला.

दिव्यांग बांधवाच्या हे लक्षात आल्यानंतर पैशाची मागणी केली. त्यावेळेस शिक्षकाने दिव्यांग बांधवाला स्टेट बँकेचा चेक दिला. पुन्हा शिक्षकावर विश्वास ठेवून बँकेत चेक भरला. त्याही ठिकाणी पुन्हा विश्वासघात झाला. बँकेत चेक गेल्यानंतर शिक्षकाने खात्यावरील पेमेंट बंद केले होते, तसे बँकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिलेले आहे. त्यानंतर दिव्यांग बांधवाने शिक्षकाशी फोनवरून संपर्क साधला असता जाणीवपूर्वक फोन उचलला जात नव्हता. दिव्यांग बांधवाने न्यायालयीन हालचाली सुरू केलेल्या आहेत. वकिलांशी चर्चा केलेली आहे. अजूनसुद्धा दिव्यांग बांधवाची इच्छा आहे, शिक्षकाने माझी फसवणूक केली तरीसुद्धा त्यांनी माझे पैसे परत करावे. अन्यथा नाईलाजाने न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे पीडित दिव्यांग बांधवांनी बारामती झटकाचे संपादक त्यांच्याशी संपर्क साधून घडलेली हकीगत सांगितलेली आहे. चेकवर शिक्षकाचे नाव आहे तरीसुद्धा बातमीत नाव छापलेले नाही. शिक्षकाने दिव्यांग बांधवाचा व्यवहार व्यवस्थीत करून अब्रूची लक्तरे वेशीवर न जाता पूर्ण करावा, यासाठी सदरची बातमी तयार केलेली आहे. शिक्षकाने सावध व्हावे, अन्यथा पुढील बातमी नावासह चेक व स्टॉप पेमेंट मॅनेजरच्या सही सह प्रसारित केली जाईल.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

9 Comments

Leave a Reply

Back to top button