वंदे मातरम गणेशोत्सव मंडळ गणेशनगर अकलूज आयोजित डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न.
मोहिते पाटील परिवारातील अनेक सदस्यांच्या गणेश मंडळाला भेटी.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज ता. माळशिरस येथील वंदे मातरम गणेशोत्सव मंडळ गणेशनगर हे मंडळ ३० वर्षात पदार्पण करत आहे. धैर्यशील मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ दरवर्षी गणपती उत्सवाचे औचित्य साधून विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी मंडळातर्फे संगीत खुर्ची, भव्य डान्स स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. उत्सवादरम्यान माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, डॉटर्स मॉम्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंडळास भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अॅड. बाळासो भिलारे, विठ्ठल खंदारे, संग्राम भिलारे, नाशिक आबा सोनवणे, महादेव पाटील, श्रीराज भैया देशमुख, सारंग कन्हेरे, अमित पुंज, बळीराम चव्हाण सर, गणेश अनपट, निलेश ठोंबरे, शैलेश दिवटे, अभिषेक भिलारे, अजय सोनवणे, दत्तात्रय गायकवाड गुरुजी, अजय कटाळे, सुमित साळुंखे, विनोद चौगुले, संतोष सोनवणे, हितेश पुंज, महेश वाघ या सर्व मान्यवरांच्या सहकार्याने गणेश उत्सवाचे औचित्य साधून दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी भव्य अशा डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा दोन गटात पार पडल्या. लहान गट व मोठा गट ही स्पर्धा राजगुरू सर, भाजपा सांस्कृतिक सेल माळशिरस तालुका सहसंयोजक अमित पुंज, मंडळाचे संस्थापक विठ्ठल खंदारे, प्रताप थोरात सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीकांत जाधव सर व देवेंद्र वर्दम सर उपस्थित होते.




या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे –
छोटा गट
प्रथम क्रमांक – रिक्तम सामंता
द्वितीय क्रमांक – धैर्यलक्ष्मी एकतपुरे
तृतीय क्रमांक( विभागून)- परिणीती पाटील / कामिल नदाफ




मोठा गट
प्रथम क्रमांक – अदिती भगत
द्वितीय क्रमांक (विभागून) – सार्थक मुदगल / कलामूर्ती ग्रुप
तृतीया क्रमांक – प्रतिभा ठोंबरे
सर्व विजेते स्पर्धकांचा मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.






नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng