ताज्या बातम्याराजकारण

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या अपेक्षा मावळल्या…

दिल्ली (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी मंथन बैठक दिल्ली येथे पार पडली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते. देशातील लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर झालेली आहेत. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदार संघातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुनश्च उमेदवारीला हिरवा कंदील मिळालेला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे. तर खासदारच असे माढा मतदारसंघात फिरत असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या अपेक्षा मावळल्या असल्याची केंद्रीय राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय कॅबिनेट व राज्यमंत्री यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री भाजपचे जेष्ठ नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित असणारे रस्ते, सिंचन, रेल्वे यासह अनेक प्रश्न मार्गी लावून भारतीय जनता पक्ष तळागाळात व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कायम प्रयत्नशील होते. माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकार्याचा गुणगौरव अनेक केंद्रातील व राज्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी करून जनतेसमोर लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण माढा लोकसभेचे खासदार यांच्या कार्यातून बोलले जात होते.

माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस कडून भारतीय जनता पक्षामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने मिळालेला होता. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अकलूज येथे जाहीर सभा घेतलेली होती. निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाची निष्ठावान फळी, उत्तमराव जानकर, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहकार्य केलेले असल्याने माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेले होते. माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असे मोहिते पाटील व कार्यकर्त्यांना वाटू लागलेले असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत खासदार होण्याचे स्वप्न धैर्यशील मोहिते पाटील पाहू लागले. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाची प्रतिमा व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप प्रत्यारोप करणे सुरू केले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा इतर पक्षांपेक्षा वेगळी असते. भारतीय जनता पक्षामध्ये बोलले जात नाही मात्र करणीला चुकत नाहीत. बारीकसारीक गोष्टींवर भाजपचे व संघाचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी राज्य व केंद्रीय नेतृत्व यांना मोहिते पाटील यांच्या हालचालीचे रिपोर्टिंग होत होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळवायचे नाही मिळाले तर अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षात जायचे असे कार्यकर्ते उघड उघड बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आलेला होता मात्र, भारतीय जनता पक्ष व संघाची ध्येयधोरणे आणि केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघामध्ये कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून सर्वसामान्य जनतेच्या व मतदारांच्या मनावर अधिराज्य केलेले होते. भाजपच्या मालदांडीमध्ये कानी कवळी उगवलेली होती. त्यामुळे मालदांडी ताठव्याला बदनाम केले जात होते. केंद्रीय नेतृत्व यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्य जनसंपर्क व पक्षीय प्रोटोकॉल सर्व पाळलेले असल्याने पुनश्च माढा लोकसभेचे उमेदवार म्हणून केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळत असताना राज्यातील नेतृत्व यांनी केलेली शिफारस महत्त्वाची ठरत आहे. अमितजी शहा महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर महाराष्ट्रातील महायुतीमध्ये आलेल्या घटक पक्षाच्या चर्चेनंतर लवकरात माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुनश्च उमेदवारीची घोषणा होणारच आहे, असे खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button