केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते “ज्ञानाचा ऊर्जास्रोत” या पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली (बारामती झटका)
आज नवी दिल्ली येथे सप्तर्षी प्रकाशन प्रकाशित “ज्ञानाचा ऊर्जास्रोत” या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कवी विकास वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


विकास वाघमारे यांनी आपल्या कामासोबत जोपासलेल्या या आवडीचे खा. मुरलीधर मोहोळ यांनी विशेष कौतुक केले. आगामी काळात देखील लिखाणासाठी मोहोळ यांनी शुभेच्छा दिल्या. लवकरच पुढची 2 पुस्तकं लिहिण्याचं काम सुरू असल्याची माहिती विकास वाघमारे यांनी मोहोळ यांना दिल्यावर त्यांनी त्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या.


या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे नियोजन व सहकार्य महाराष्ट्र सदन नवी दिल्लीचे सहाय्यक निवासी आयुक्त श्री. राजेश अडपवार तथा महाराष्ट्र सुरक्षा बल व दिल्ली युनिटचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी श्री. अनिल चोरगे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.