खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि विजयवाडी ग्रामस्थ यांच्यात चर्चेअंती प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्नावर तोडगा निघाला.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील शिष्टमंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना व माळशिरस तालुका विकास आघाडी यांची शिष्टाई कामी आली, लोकसभेच्या मतदानावरील निर्णय मागे घेण्यात आला…
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा स्मशानभूमीचा प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सुटला नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला होता. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे शिष्टमंडळ व माळशिरस तालुका विकास आघाडी यांची शिष्टाई कामी आली असून लोकसभेच्या मतदानावरील निर्णय मागे घेतलेला असून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि विजयवाडी ग्रामस्थ यांच्यात चर्चेअंती प्रलंबित स्मशानभूमीच्या प्रश्नावर तोडगा निघालेला आहे.


खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयवाडी ग्रामस्थांशी संपर्क साधला. यावेळी माळशिरस तालुका विकास आघाडीचे ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर, विजयवाडीचे माजी सरपंच विठ्ठलराव इंगळे, युवा उद्योजक अमोलजी यादव, खुडूस गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील, माजी उपसरपंच रणजितसिंह ठवरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या 50 वर्षापासून विजयवाडी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न होता. एखादा व्यक्ती वारल्यानंतर परिवाराला दुःखापेक्षा दहन कुठे करायचं याचीच चिंता वाटत असायची. त्यामुळे हा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल उपस्थित करून समाज बांधवांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला होता. लोकसभेला मतदानच करायचं नाही. मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला होता. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे शिष्टमंडळ व माळशिरस तालुका विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या शिष्टाईला यश आलेले असून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा करून प्रलंबित स्मशानभूमीच्या प्रश्नावर तोडगा निघालेला असल्याने विजयवाडी गावातील ग्रामस्थ यांनी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.