ताज्या बातम्या

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मधुर मिलन येथील स्नेह मेळावा कार्यक्रमाची पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपचे महाविजय 2024 संयोजक आमदार श्रीकांतजी भारतीय, माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या व आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

नातेपुते (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बुधवार दि. 22 नोव्हेंबर मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते येथे सायंकाळी 04 वाजता स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मधुर मिलन येथील स्नेह मेळावा कार्यक्रमाची पाहणी करण्याकरता सदिच्छा भेट दिली. यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, माळशिरस तालुका युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी श्रीमंतराजे बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मधुर मिलन कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य स्टेज उभारण्यात आलेले आहे. बसण्यासाठी खुर्च्यांचे नियोजन केलेले आहे. लाईट व साऊंड सिस्टिम उभारलेली आहे.

भारतीय जनता पार्टी महाविजय 2024 प्रदेश प्रमुख आमदार श्रीकांतजी भारतीय व माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतमालक परिचारक, सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते, स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, करमाळा विधानसभेचे माजी आमदार जयवंतराव जगताप, राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार गट) अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन माढा तालुक्याचे युवा नेते रणजितभैय्या शिंदे, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button