ताज्या बातम्या

खंडकरी शेतकऱ्यांचा तारणहार हरपला….

महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. बी. डी. पाटील उर्फ अण्णा त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

दहिगाव (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. बी. डी. (आण्णा) पाटील, दहिगाव जि. सोलापूर, वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज दि. 06/12/2024 पहाटे निधन झाले असुन अंत्यविधी पाटीलवस्ती, दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापुर, येथे दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

आण्णा नावाने महाराष्ट्रभर परिचित असणारे काँग्रेसची विचारधारा जपणारे नेते, अतिशय कष्टातुन शिवाजी कॉलेज, (रयत शिक्षण संस्था, सातारा) येथून बी. ए. बी. एड. पुर्ण करुन वालचंद विद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली. परंतु, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या संपर्कात आल्याने समाज कार्यास सुरुवात केली. मा. नानासाहेब देशमुख यांच्याबरोबर शंकर सह. साखर कारखाना येथे संचालक म्हणून काम केले. एस. टी. महामंडळ व कॉटन फेडरेशन व बोर्डिंग हाऊसचे संचालक म्हणून काम केले. गेली चाळीस वर्षे अहिंसात्मक मार्गाने खंडकरी शेतकऱ्यांचा लढा दिला. जवळपास 25,000 एकर जमीन शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे कार्य केले.

निर्व्यसनी, करारी, कडक शिस्त, अभ्यासू बाणा पण तितकाच हळवेपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन सुना, नातवंडे, दोन भाऊ, तीन भावजया, चार बहिणी, पुतणे व पुतण्या असा मोठा परिवार आहे. बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button