खासदारांनी शब्द पुर्ण केला; निरा-देवघर योजनेमध्ये माळशिरस तालुक्यातील १६ गावांचा समावेश; जलनायक शिवराज पुकळे यांच्या ७ वर्षीय संघर्षाला यश!

फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यतत्पर पाणीदार खासदार निंबाळकर व जलनायक शिवराज पुकळे यांचे जनतेकडून अभिनंदन!
पिलीव (बारामती झटका)
निरा-देवघर योजनेमध्ये माळशिरस तालुक्यातील उर्वरित सर्वच्या सर्व गावांना कार्यकारी समितीने मान्यता दिली. कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी दिलेला शब्द पुर्ण केला. दादा देवदूत आहात तुम्ही आमच्यासाठी. या तालुक्यातील दुष्काळी जनता तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, अशी भावना माळशिरस तालुक्यातील दुष्काळी जनतेतून होत आहे. जलनायक शिवराज पुकळे यांनी गेली ७ वर्षे केलेल्या संघर्षाचं चीज झालं…

निरा-देवघर योजनेमध्ये माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी गावांचा समावेश करण्यासाठी जो संघर्ष केला, तो पुर्णत्वास येऊन बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी, कोथळे, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, गारवाड-मगरवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ, जळभावी, भांब, पिलीव, काळमवाडी, कोळेगाव व चांदापूरी या सर्व गावांचा समावेश झाला. कार्यकारी समितीने काल मान्यता दिली. कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब दुष्काळी जनतेच्या आर्त हाकेला देवदूत म्हणून धावुन आले आहेत. अनेक पिढ्यांपासून दुष्काळाचा कलंक तालुक्यातील काही गावांना लागला होता, तो कलंक पुसण्यासाठी कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. त्याबद्दल कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जलनायक शिवराज पुकळे यांचे जनतेकडून फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार अभिनंदन करून जल्लोष साजरा करण्यात आला.

माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांच्या समावेश संघर्षाला ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत साथ दिली, विश्वास ठेवला. त्या सर्वांचे अंतःकरणापासुन जलनायक शिवराज पुकळे यांनी धन्यवाद मानले आहेत. अनेक पिढ्यांपासून जे कोणालाच जमले नाही ते कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करून दाखवले. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेमधून खासदार निंबाळकर हे देवदूत आहेत अशाप्रकारच्या भावना लोकांमधुन व्यक्त होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.