ताज्या बातम्यासामाजिक

खेड पोलिसांची कामगिरी; चंडीगढ़ मधून आरोपीला उचलले!!

बनावट “ट्रेडिंग ॲप्लिकेशन” व “शेअर मार्केट ट्रेडिंग” करून २४/८५/००० रुपयांना लोकांना फसवले…

जवळ जवळ ६५ बँक खात्यातून पैसे वळवले !!

खेड पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून आरोपीला पकडून केली अटक!

रत्नागिरी (बारामती झटका)

चंडीगढ़ येथून बनावट “ट्रेडिंग ॲप्लिकेशन” व “शेअर मार्केट ट्रेडिंग” करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मुख्य इसमास खेड पोलीसांद्वारे अटक करण्यात आली आहे.

दि. १९/४/२०२४ ते दि. २४/५/२०२४ रोजी फिर्यादी यांना “ARK Learning Group” या WhatsApp ग्रुपवरील ट्रेडींग संदर्भातील मेसेज तसेच ८२५०७३३५०३ आणि ८७३५९३८२३९ या मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या WhatsApp संदेशद्वारे फिर्यादी यांना “ARK Investment Group” या कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल, असे सांगून फिर्यादी यांची अनोळखी इसमांनी रू. २४,८५,०००/- रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. म्हणून दि. ०३/०६/२०२४ रोजी खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. १९९/२०२४ भा.द.वि.सं. चे कलम ४१९, ४२० सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम ६६ (क),(ड) अन्वये ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी अपहरित रक्कम रु. २४,८५,०००/- ही आरोपीच्या 6 वेगवेगळ्या बँक अकाउंट वर पाठविलेली होती. सदर ६ बँक अकाऊंट बाबत खेड पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेण्यात आली व फिर्यादी यांची अपहरित रक्कम ही पुढे अन्य ४३ बँक अकाऊंट मध्ये वळवण्यात आल्याबाबत व पुढे २२ वेगवेगळ्या अकाउंट मध्ये वळवण्यात आल्याबाबत माहिती समोर आली व या अपहरित रक्कम पैकी रू. ४,५०,०००/- हे चंडीगढ़ व जोधपूर येथील ATM चा वापर करून काढण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, चंडीगढ़ व जोधपूर-राजस्थान या राज्यांमध्ये खेड पोलीस ठाण्याचे एक तपास पथक पाठविण्यात आले.

या तपास पथकाने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या तपासामध्ये एटीएम मधून पैसे काढणाऱ्या इसमाबाबत माहिती घेतली असता एक इसम आपल्या व्यसनाच्या लोभापोटी अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरून ATM मधून पैसे काढून त्याच्या ताब्यात देत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर इसमाचा शोध घेण्यात आला व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नीरज महेंद्र जांगरा, वय – २२ वर्षे, सध्या राहणार घर नंबर १७८, सेक्टर ३८(A), चंडीगढ़, मुळ राहणार कुर्दल – ७०, भिवाणी-हरियाणा हा चंडीगढ़ येथे मिळून आलेला आहे.

तसेच त्यास दि. २१/०६/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली असून मा. न्यायालयाने त्यास दि. ३५/६/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा गुन्हा करताना त्याने अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने अनेक बँक खाते उघडून त्यावर अनेकांकडून रक्कम प्राप्त करुन घेऊन अनेक बँक खात्यांचा व मोबाईल नंबरचा वापर करून फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.
1) श्री. नितीन भोयर, पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे, रत्नागिरी
2) स.पो.नि. श्री. संजय चव्हाण, खेड पोलीस ठाणे,
3) पो. हवा/४७६ दिपक गोरे, खेड पोलीस ठाणे,
4) पो.कॉ/९६२ श्री. वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे,
5) पो.शि/१३१५ रुपेश जोगी, खेड पोलीस ठाणे
6) पो.शि /६१३ सुमित नवघरे, खेड पोलीस ठाणे
7) पो.शि /९१० शिरीष साळुंखे, खेड पोलीस ठाणे
8) पो.हवा /४४४ रमिज शेख, तांत्रिक विश्लेषण शाखा व
9) पो.शि/७३९ सौरभ कदम, सायबर पोलीस ठाणे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, शेअर ट्रेडिंग Apps चा वापर करून शेअर मार्केट अथवा ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग Apps ची सत्यता बाबत पडताळणी करावी. कमी कालावधीतील जास्त परतव्याच्या आमिषाला बळी पडू नका.Telegram किंवा WhatsApp द्वारे प्राप्त लिंक वरून ट्रेडिंग App डाउनलोड करू नका.
श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort