खुडूस गावातील राजकीय व कुस्ती क्षेत्रातील अग्रगण्य असणारे लोखंडे परिवार भाजपच्या वाटेवर..

दे धक्का : माळशिरस विधानसभेचे आ. उत्तमराव जानकर व माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे यांच्या गटाला धक्का…
खुडूस (बारामती झटका)
खुडूस, ता. माळशिरस येथील राजकीय व कुस्ती क्षेत्रातील अग्रगण्य असणारे लोखंडे परिवार लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून लोखंडे परिवार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
स्वर्गीय आप्पासाहेब बाळू लोखंडे, स्वर्गीय नारायण बाळू लोखंडे, स्वर्गीय जगन्नाथ आप्पा लोखंडे यांच्या विचारांचा वारसा कैलासवासी आप्पासाहेब लोखंडे, कुस्ती संकुल खुडूस संस्थापक वस्ताद ज्ञानदेव (नाना) लोखंडे आणि लोखंडे परिवारातील वस्ताद प्रभाकर (भाऊ) लोखंडे, श्रीकृष्ण लोककल्याण फाउंडेशन खुडूस संस्थापक अध्यक्ष पैलवान अमोल (रावजी) लोखंडे, सिताराम लोखंडे, महादेव बापू लोखंडे, लिंगाप्पा लोखंडे, साधू लोखंडे, बापूराव लोखंडे, अण्णासाहेब काका लोखंडे, अर्जुन लोखंडे, विष्णू लोखंडे, राजेंद्र लोखंडे, समाधान लोखंडे, अतुल लोखंडे असा लोखंडे परिवार भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहे.

माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर व माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे यांच्या खांद्याला खांदा लावून 35 वर्ष खुडूस गावात व तालुक्यात राजकारण बिजलीमल्ल वस्ताद ज्ञानदेव लोखंडे व लोखंडे परिवार यांनी केलेले आहे. कोणत्याही कार्यक्रमांमध्ये उत्तमराव जानकर व मच्छिंद्रआबा ठवरे यांना मानसन्मान दिला जात होता. खुडूस गावामध्ये मच्छिंद्र आबा ठवरे परिवारांची एक हाती सत्ता ठेवण्यामध्ये लोखंडे परिवार यांचा सिंहाचा वाटा होता.
कैलासवासी आप्पासाहेब बाळू लोखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व कैलासवासी नारायण बाळू लोखंडे व कैलासवासी जगन्नाथ आप्पा लोखंडे यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान खडूस येथे घेतले जाते. सदरच्या मैदानामध्ये उत्तमराव जानकर व मच्छिंद्रआबा ठवरे यांचे फोटो कायम होते, मात्र यंदा गुरुवार दि. 25/12/2025 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. सदरच्या कुस्ती मैदानाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री, पालकमंत्री, माजी खासदार, माजी आमदार यांचे फोटो लावलेले असल्याने माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर व माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे यांच्या गटाला धक्का मिळणार आहे. लोखंडे परिवार यांनी दे धक्का, अशी भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



