खुडूस येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त खुडूस चषक क्रिकेट स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

खुडूस (बारामती झटका)
खुडूस ता. माळशिरस, येथे लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पै. समीरभैया काझी मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य खुडूस चषक क्रिकेट स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दि. २५/०१/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता खुडूस (ब्रिजच्या शेजारी), ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमध्ये पैलवान समीर भैया काझी यांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये अनुक्रमे २२,२२२/-, ११,१११/- ७,७७७/- आणि ५,५५५/- आणि चषक अशी बक्षिसे असणार आहेत.
तसेच सलग चार षटकार, सलग चार चौकार, सलग चार विकेट, मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज यासाठी १,१११ रु. बक्षीस देण्यात येणार आहे.

रक्तदान हेच जीवनदान आणि रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या अंतर्गत प्रत्येक टीमच्या पाच खेळाडूंनी रक्तदान करणे बंधनकारक आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी करण लवटे ८३०८५४९५८९, छगन शिंदे ९०२११०१४६१, शाहरुख शेख ९६०७८१४८५२, दत्ता जाधव ८८०५८०९३०२, सचिन करडे ७०२०६५८७३१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे संयोजन बी. आर. प्रतिष्ठान, फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय मंडळ, परफेक्ट फिटनेस क्लब, अहिल्यादेवी तरुण मंडळ झिरेपठार, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, शिरसाई देवी तरुण मंडळ बोरकरवस्ती, राजवीर उद्योग समूह एकतानगर, एस. पी. ग्रुप भीमनगर, सूर्यनिल ट्रेडर्स विझोरी, मैत्री साम्राज्य अकलूज, रुबाब उद्योग समूह अकलूज, ब्रदर्स कंपनी माळीनगर, स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र भांबुर्डी, डी. एस. स्टॉक मार्केट माळशिरस, द क्राईम न्यूज, जे. एम. डी. मोबाईल शॉपी बार्शी, डी. एस. स्टॉक मार्केट अकॅडमी बार्शी, श्री अमृतवर्षा ट्रेडिंग कंपनी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे, सिद्धिविनायक ग्रुप शिवतेजनगर यांनी केले आहे. तरी क्रिकेटप्रेमींनी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक पै. समीर भैया काझी मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.