किरण बाबा गायकवाड यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; संयुक्त जयंती उत्साहात साजरी

लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त किरण बाबा गायकवाड (बाबा ग्रुप) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम माळशिरस तालुक्याचे जनप्रिय लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत श्री. सुजयसिंह माने-पाटील (अकलूज मंडळ अध्यक्ष), श्री. महादेवराव कावळे (अकलूज शहराध्यक्ष), श्री. महेश भाऊ शिंदे (नगरसेवक), श्री. किसनराव शिंदे (ओबीसी सेल शहराध्यक्ष), श्री. राहुल भैय्या लोंढे (नगरसेवक तथा गटनेते), सौ. जयश्रीताई वाघमोडे (नगरसेविका), सौ. दिपाली संतोष वाघमोडे (नगरसेविका) आदी मान्यवरांसह पक्षाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच बाबा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन ‘बाबा ग्रुप मित्र मंडळ, किरण सरवदे, योगेश पवार, सागर वाघमारे, सोमनाथ कांबळे, सदा गेजगे, सुरज गायकवाड, अक्षय कोतमिरे, विनायक अवघडे, सोन्या गेजगे, गणेश कांबळे, सुयश पवार, आकाश भोपळे, आकाश गायकवाड व सर्व मित्र परिवार अकलूज’ यांनी केले.

या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल १३७ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर आरोग्य शिबिरामध्ये ७३२ नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात आल्या व आवश्यक सल्ला देण्यात आला.
आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशा समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळत असून, किरण बाबा गायकवाड यांनी जयंती साजरी करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. केवळ औपचारिक कार्यक्रम न करता, समाजासाठी उपयुक्त कार्यातून महापुरुषांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ समाजसेवेतूनच प्रकट होतो, याचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले. हे शिबिर सेवासदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. या शिबिरात अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला.

या जनहिताच्या कार्यक्रमासाठी समस्त अकलूज शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, डॉक्टरांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



