किरण भांगे यांची ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती.

अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील चाकोरे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांची जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा विभाग) सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती कऱण्यात आली आहे. या निवड समितीच्या झालेल्या बैठकीनुसार प्र. जिल्हाधिकारी कुलदिप जंगम सो. (भाप्रसे) यांनी शासकीय-अशासकीय सदस्य नियुक्तीचा आदेश पारित केला आहे.
किरण भांगे यांनी वैधमापन शास्त्र विभागाकडे पाठपुरावा करत स्वस्त धान्य दुकान, गॅस एजन्सीची तपासणी करून ग्राहकांची होणारी काटामारी, फसवणूक थांबविण्यासाठी वजनमापे कायद्याअंतर्गत खटले दाखल करणे, गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वाहतूक शुल्क (रीबेट) कॅश ऍण्ड कॅरीच्या माध्यमातून परत मिळवून देणेबाबत जनजागृती करणे, महावितरण विज नियामक कायदा-२००३ चे कलम – ५६ नुसार वीज ग्राहकांना नोटीस न बजावता वीजप्रवाह खंडित करित असल्याने केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये प्राप्त माहितीआधारे सर्वेक्षण करून अधिनियमाचे उल्लंघन करून नोटीस न बजावता वीज पुरवठा खंडित करणे बेकायदेशीर असून वीजपुरवठा खंडित करू नये, असे आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन व प्रबोधन करणे, पुरवठा विभागाच्या जिल्हा व तालुका, ग्रामदक्षता समिती स्थापन करावी ही बाब पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून देणे इत्यादी सारख्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा प्रशासनाने निवड केली आहे.

शासन निर्णय क्र.ग्राराप.1013/प्र.क्र.119/ग्रास-2 व ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम-7 व 8 नुसार जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करून आशासकिय सदस्य नियुक्त करण्याची तरतूद आहे.
आगामी काळात वीज नियामक कायदा २००३ चे कलम-५५ चे उल्लंघन करून वीज ग्राहकांच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. याबाबत महावितरण प्रशासनाला इशारा देऊन आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. – किरण भांगे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



