ताज्या बातम्या

कुर्डूवाडी प्रांत कार्यालयामध्ये पोलीस पाटील अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी

लऊळ (बारामती झटका)

पोलिस पाटील भरती अर्जासाठी दि. ०५ ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली असता. आज दि. ०३ रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कुर्डूवाडी ता. माढा येथे पोलीस पाटील पदास अर्ज सादर करण्यासाठी माढा व करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावातील उमेदवारांची प्रांत कार्यालय कुर्डूवाडी येथे सकाळ १० पासून ते संध्या १० वाजेपर्यंत गर्दी पाहायला मिळाली. आज अखेर माढा तालुक्यातील २५ गावांमधील रिक्त पदासाठी तर करमाळा तालुक्यातील २३ गावांमधील रिक्त पदासाठी अर्ज सादर केले आहे.

आणखी दोन दिवस मुदत वाढवल्यामुळे उमेदवारांचा ओघ असाच पाहायला भेटेल. अर्ज स्वीकारण्यासाठी अतिरिक्त दोन टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढवण्यात आलेली होती.

युवकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे या पोलीस पाटील भरतीमध्ये जास्त करून युवा उमेदवार दिसत होते.

अर्ज दाखल करण्यासाठी कमी असलेले कागदपत्रे छाननीच्या अखेरच्या वेळेपर्यंत प्रतिपूर्ती साठी मुदत दिलेली आहे. – प्रियंका आंबेकर पोलीस पाटील निवड समिती अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, माढा

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button