कोण कोणासोबत आहे, यापेक्षा भाजप रामभाऊ सोबत आहे, याचा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान आहे….

हातच्या काकणाला आरसा कशाला, माळशिरस तालुका भाजपमय झालाय सांगायला कुडमुडे ज्योतिषाची गरज नाही.
लोकसभेला कोण देवेंद्र ओळखत नाही म्हणणारे दिवसा चांदण्या दिसून दिवा स्वप्ने पाहू लागली, तालुक्यातील जनता हसू लागली…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये परिस्थितीनुसार घराणे पक्ष बदलणारी आहेत. त्यापैकीच एका घराण्यातील राजकीय चाणक्य समजले जाणारे मात्र, समाजामध्ये गावठी चाणक्य म्हणून सुपरिचित असणारे स्वयंघोषित नेत्यानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोण कोणासोबत आहे याचा उलघडा केलेला आहे. कोण कोणासोबत आहे, यापेक्षा माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते उर्फ रामभाऊ सोबत भाजप आहे. याचा भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान आहे. लोकसभेच्या निवडणुकीला कोण देवेंद्र ओळखत नाही, म्हणणाऱ्या लोकांना दिवसा चांदण्या दिसू लागल्या. दिवा स्वप्ने पाहू लागली, तालुक्यातील जनता हसू लागली, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर माळशिरस तालुक्यातील राजकीय चित्र बदललेले आहे. भारतीय जनता पक्षाने माळशिरस तालुक्यातील सर्व सूत्रे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या हातामध्ये सोपवलेली आहेत. तालुक्यातील संघटन दिवसेंदिवस मजबूत होत चाललेले आहे. तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांच्या निवडी पक्ष संघटन व पक्ष वाढीसाठी काम जोमाने सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यामध्ये पक्ष संघटन व विकास कामांची दमदार कामगिरी सुरू आहे. आरोग्यद्युत राम सातपुते यांचा विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या जिव्हारी लागलेला आहे. दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग जोरात सुरुवात आहे. गावागावात वाड्या वस्त्यावर राम सातपुते समर्थकांची संख्या वाढत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती बरोबरच अकलूज नगर परिषद निवडणूक सुद्धा होणार आहे. अकलूज नगर परिषद निवडणूक पहिल्यांदा होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाची आठवण का झाली, याचीही तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे. कारखाना संस्था, पतसंस्था यांच्यामध्ये गोरगरीब व सर्वसामान्य जनतेवर केलेला अन्याय, भ्रष्टाचार लपविण्याकरता भारतीय जनता पक्षाचा आसरा घेण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचीही राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे.
राम सातपुते यांनी भारतीय जनता पक्षाचे एवढे संघटन वाढवलेले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा निश्चित फडकणार आहे. ग्रामीण भागामध्ये म्हण प्रचलित आहे हातच्या काकणाला आरसा कशाला, तालुका भाजपमय झालाय सांगायला कुडमुडे ज्योतिषाची गरज नाही अशी निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



