“कोणाची मका, कोल्यांची भांडणे”, अशी अवस्था जलसंधारण कामांची झालेली आहे…
माळशिरस तालुक्यातील मृदा व जलसंधारण विभागाच्या 42 कामांची निविदा निघाली, मुदत संपून सुद्धा ओपन का झाली नाही, कार्यकारी अभियंता ‘दामा’ यांचे हात कोणी ‘दामा’टले
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये 42 कामांसाठी मंजूर केलेला आहे. सदरच्या कामांची निविदा प्रक्रिया कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यी. दामा यांनी पूर्ण केलेली आहे.
सदरच्या कामांच्या निविदा अनेक ठेकेदारांनी दि. 12/07/2024 ते 26/07/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये दिलेल्या आहेत. सदरच्या निविदा उघडण्याचा दि. 29/07/2024 दिवस होता. मात्र, अद्यापपर्यंत सदरच्या कामांची निविदा ओपन केलेली नाही. समाजामध्ये म्हण प्रचलित आहे, “कोणाची मका, कोल्यांची भांडणे”, अशी अवस्था जलसंधारण विभागाची झालेली आहे. कार्यकारी अभियंता “दामा” यांचे हात कोणी “दामा”टले त्यामुळे अद्यापपर्यंत निविदा ओपन झालेल्या नाहीत. निविदाधारक ठेकेदार यांच्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यातील 42 कामांमध्ये –
१) सिमेंट नाला बंधारा भांबुर्डी (सरस्वती वाघमोडे शेत) ता. माळशिरस ३५.५१ लाख रु., २) सिमेंट नाला बंधारा मांडवे, (दामोदर दादा पालवे शेत) ता. माळशिरस २९.१९ लाख रू., ३) सिमेंट नाला बंधारा मांडवे (दत्तू यशवंत पालवे शेत) ता. माळशिरस २८.९८ लाख रू., ४) सिमेंट नाला बंधारा मांडवे (गायरान) ता. माळशिरस ३९.३० लाख रु. ५) सिमेंट नाला बंधारा मांडवे (जगन्नाथ भालचंद्र कुलकर्णी शेत) ता. माळशिरस ३२.४७ लाख रु., ६) सिमेंट नाला बंधारा मांडवे (पालखीतळ) ता. माळशिरस ३५.९० लाख रु., ७) सिमेंट नाला बंधारा मांडवे (राहुल शिवाजी रुपनवर शेत) ता. माळशिरस ३२.२३ लाख रु., ८) सिमेंट नाला बंधारा मांडवे (शिवाजी ढोबळे शेत) ता. माळशिरस ३९.०१ लाख रु., ९) सिमेंट नाला बंधारा येळीव (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस ३०.८३ लाख रु., १०) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. १ (भगत शेत पुलाजवळ) ता. माळशिरस २७.६० लाख रु., ११) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. २ (भगत शेत) ता. माळशिरस ३०.५१ लाख रु., १२) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ३ (दादासो खांडे शेत) ता. माळशिरस ४०.५६ लाख रु. १३) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ४ (सुरेश महादेव धुमाळ शेत) ता. माळशिरस २१.७७ लाख रु., १४) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ५ (पुलाजवळ) ता. माळशिरस ३३.६३ लाख रु., १५) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ६ (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस ३७.०४ लाख रु., १६) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ७ (निकम शेत) ता. माळशिरस ३६.९८ लाख रू., १७) सिमेंट नाला बंधारा जाधववाडी क्र. १ (रामचंद्र जाधव शेत) ता. माळशिरस ४५.७७ लाख रु., १८) सिमेंट नाला बंधारा जाधववाडी क्र. २ (विजय दोशी शेत) ता. माळशिरस ४५.७७ लाख रु. १९) सिमेंट नाला बंधारा जाधववाडी क्र. ३ (जगन्नाथ वाघमोडे शेत) ता. माळशिरस ४०.११ लाख रु., २०) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. १ (तात्यासाहेब ठवरे शेत) ता. माळशिरस १०.७८ लाख रु., २१) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. २ (मधुकर शिवाजी काळे शेत) ता. माळशिरस १०.७८ लाख रु., २२) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. ३ (मारुती श्रीपती कुलाळ शेत) ता. माळशिरस १०.७८ लाख रु. २३) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. ४ (पानीव रोड कपणे/काळे शेत) ता. माळशिरस १०.७५ लाख रु. २४) सिमेंट नाला बंधारा मारकडवाडी क्र. १ (पाणीपुरवठा विहिरीजवळ) ता. माळशिरस ४५.०९ लाख रु., २५) सिमेंट नाला बंधारा मारकडवाडी क्र. २ (उत्तम मारकड शेत) ता. माळशिरस ४५.०९ लाख रु. २६) सिमेंट नाला बंधारा शिंदेवाडी क्र. १ (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस ३३.६० लाख रु., २७) सिमेंट नाला बंधारा शिंदेवाडी क्र. २ ता. माळशिरस ३०.२३ लाख रु., २८) सिमेंट नाला बंधारा झिंजेवस्ती (मुलाणी वस्ती) ता. माळशिरस २९.१४ लाख रु., २९) सिमेंट नाला बंधारात कळंबोली क्र. १ ता. माळशिरस १८.१९ लाख रु. ३०) सिमेंट नाला बंधारा मेडद (जगताप शेत) ता. माळशिरस २५.५८ लाख रु., ३१) सिमेंट नाला बंधारा मेडद (ननवरे वस्ती) ता. माळशिरस २५.६१ लाख रु., ३२) सिमेंट नाला बंधारा मोटेवाडी (फोंडशिरस) क्र. ३ ता. माळशिरस २५.५८ लाख रु., ३३) सिमेंट नालाबंधारा विठ्ठलवाडी (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस १७.५४ लाख रु. ३४) सिमेंट नाला बंधारा मोटेवाडी (फोंडशिरस) क्र. २ ता. माळशिरस २६.५३ लाख रु., ३५) सिमेंट नाला बंधारा एकशिव क्र. २ ता. माळशिरस २३.८८ लाख रु., ३६) सिमेंट नाला बंधारा प्रतापनगर क्र. १ (भंडालकर-जाधव शेत) ता. माळशिरस २२.०० लाख रु., ३७) सिमेंट नालाबंधारा तिरवंडी क्र. ४ (लक्ष्मण माने-माणिक वाघ) ता. माळशिरस ३१.१५ लाख रु. ३८) सिमेंट नालाबंधारा तिरवंडी क्र. १ (शांता रुपनवर-पांडुरंग वाघमोडे) ता. माळशिरस ३१.१५ लाख रु., ३९) सिमेंट नालाबंधारा प्रताप नगर क्र. २ (भंडालकर-बनकर शेत) ता. माळशिरस २२.०० लाख रु., ४०) सिमेंट नाला बंधारा कचरेवाडी क्र. १ (सरगर-धायगुडे) ता. माळशिरस १३.२२ लाख रु., ४१) सिमेंट नाला बंधारा तिरवंडी क्र. ५ (भंडालकर शेत) ता. माळशिरस ३१.१५ लाख रु., ४२) सिमेंट नाला बंधारा फळवणी क्र. १ (महाविद्यालयाजवळ) ता. माळशिरस २९.५४ लाख रु. अशी कामे आहेत.
सदरच्या कामांमध्ये अनेक ठेकेदारांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सदरची कामे मंजूर करून घेतलेली आहेत. ठेकेदारांनी सदरची कामे योग्य पद्धतीने व अंदाजपत्रकानुसार करणे गरजेचे आहे. टेंडर प्रोसेस मॅनेज होता कामा नये, यासाठी प्रत्येक गावातील स्थानिक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांनी जागरूक राहून सदरची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. नाही तर पाण्यासाठी आलेला पैसा ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने कुठे मुरवून घेतील, हे सांगता येणार नाही. यासाठी स्थानिक कार्यकर्ते यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी माळशिरस तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Nutra Gears naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.