क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली..

स्वाभिमानी शेतकरी संघटना व महात्मा फुले युवा मंच यांनी क्रांतीसुर्य भारतरत्न महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जपला माणुसकीचा धर्म
पिसेवाडी (बारामती झटका)
क्रांतीसुर्य भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त पिसेवाडी, ता. माळशिरस येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख नारायण बोराडे व महात्मा फुले विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते यांनी सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इतर वायफळ खर्च टाळून समाजापुढे आदर्श निर्माण करून शाळेतील मुलांना वह्या, खाऊ वाटप करून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता वृक्षारोपण कार्यक्रम हाती ठेवून एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आंदोलनवीर अजितभैया बोरकर, पिसेवाडी गावचे युवा नेते उमेश काका भाकरे, ॲड. रामचंद्र ताटे, डॉ. सचिन शेंडगे, डॉ. धनंजय म्हेत्रे, शैलेश भाकरे, अजय बोडरे आदी नेते मंडळींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी बोलताना सांगितले कि, प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी समाजामध्ये जनजागृती करून समाजाला दिशा देण्याचे काम केलेले होते. महात्मा फुले यांचा आदर्श आजच्या पिढीतील मुलांनी घेऊन खऱ्या अर्थाने समाजाची व देशाची सेवा करावी असा मौलिक सल्ला अजितभैया बोरकर यांनी आपल्या विचारांमधून बालकांसमोर मांडला होता.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.