क्रूरतेने वागणूक केल्याच्या कारणावरून नवऱ्याला घटस्फोट मंजूर
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयात गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर न्यायनिर्णय देताना न्यायमूर्ती श्रीमती एम. आर. धानोरकर यांनी पत्नीने पतीला वेळोवेळी क्रूरतेने वागवून अपमानित केलेचे कारणावरून घटस्फोट मंजूर केला आहे.
लग्नानंतर पत्नी “लग्न केवळ आईच्या इच्छेखातर केले असून तुम्ही मला पसंत नाही,” असे बोलून वारंवार नवऱ्याला अपमानित करीत होती. तसेच स्वतःच्या लहान मुलीला घेऊ न देणे, आत्महत्या करण्याची धमकी देणे असे प्रकार पत्नी कडून होत होते, कोणत्याही ठोस कारणाशिवाय पत्नी पतीला सोडून माहेरी राहत होती. त्यामूळे पतीने वकीलांमार्फत माळशिरस कोर्टात धाव घेतली आणि घटस्फोटाची मागणी केली असता, पत्नीने कोर्टात हजर राहून तिला मानसिक त्रास दिल्याचे तसेच नवऱ्याने माहेरहून पैशाची मागणी केल्याचे आणि हाकलून दिल्याचे आरोप केले.
मात्र, सदर आरोप सिध्द न झाल्याने, कोर्टाने नवरा बायकोमध्ये कधीही परत एकत्र न येऊ शकणारे नाते निर्माण झाले असून घटस्फोट मंजूर करणे आवश्यक असल्याचा पतीच्या वकिलांचा युक्तीवाद आणि कोर्टासमोर आलेल्या पुराव्यांवर पतीला घटस्टफोट मंजूर केला आहे. सदर केसमध्ये पतीकडून ॲड. सुमित सावंत, माळशिरस यांनी काम पाहिले.
क्रूरतेच्या कारणावरून पतीला घटस्फोट मिळण्याचे प्रमाण फार कमी असून पतीला होणारी क्रुरता सिद्ध करणे फार कठिण समजले जाते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.