कृषी भूषण यांच्या घरी ॲड. एम. एम. मगर यांची सदिच्छा भेट.

निमगाव (म.) (बारामती झटका)
कृषी भूषण श्री. जगन्नाथ पंढरीनाथ मगर निमगाव (म.), ता. माळशिरस यांच्या घरी दि. ६/८/२०२५ रोजी आपला युवक शेतकरी फोरम चे संस्थापक अध्यक्ष श्री. ॲड. एम. एम. मगर त्याचप्रमाणे बबन जाधव सर, प्रो. तानाजी मगर, रामभाऊ म्हस्के, शास्त्रज्ञ सागर सावंत, प्रियांका मगर-सावंत आदी मान्यवरांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलेले शेणखत, पिके व गाई या सर्वांची पाहणी केली.
जगन्नाथ मगर यांचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांचा आम्हाला स्वाभिमान आहे, असे उदगार ॲड. एम. एम. मगर यांनी काढले. त्यांच्या घरी दुपारचे भोजन घेऊन मग त्यांना निरोप देण्यात आला.
सर्व शेतकरी बांधवांनी कृषी भूषण जगन्नाथ मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती करुन चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यावे, असे आवाहन ॲड. एम. एम. मगर यांनी केले. त्यासाठी सरकारी पातळीवर व वैयक्तिक सहकार्य करण्याचे आश्वासन ॲड. एम. एम. मगर यांनी दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



