कृषी दिनानिमित्त फोंडशिरस येथे कृषीदूतांकडुन वृक्षारोपण संपन्न
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त बाणलिंग विद्यालयात वृक्षारोपण समारंभ दि. ०१ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदित्य कारकले, प्रतिक बिरादार, तानाजी बिराजदार, अली शेख, अजिंक्य कांबळे, रोहित शिंदे, गणेश सुरवसे, करण जाधव या कृषिदूतांनी केले होते. या कार्यक्रमास विद्यालयाचे सभापती हणमंत कुंभार, मुख्याध्यापक श्रीकांत दाते, अमोल शेंडगे, सौरभ रानधवन, अभिजित शिंदे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Your expertise on [topic] is evident. Thanks for sharing your insights!
…………