कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंडल कृषी अधिकारी सतीश कचरे यांना सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस मंडल कृषी अधिकारी सतीश कचरे यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृषी विभागाचा नागरी सेवा क्षेत्र सेवेचा सर्वोच्च असणारा सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रात नातेपुते मंडलचे कृषी अधिकारी सतीश कचरे यांनी प्राचार्य, व्याख्याता, मार्गदर्शक, सहसंपादक, प्रचार, प्रसार, प्रसिद्धी, अतिक्रमण मुक्त तालुका बीजगुणांना क्षेत्र, महसूल वाढविणे, 43 पीक स्पर्धा लाभार्थी घडवणे, राज्यातील पहिले ISO मंडल, राज्यातील पहिले क्यूआर कोडद्वारे मार्गदर्शन करणारे मंडळ, राज्यातील सर्वात जास्त यशोगाथा लेख प्रसारित करणारे मंडळ इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उल्लेखनीय उत्कृष्ट काम करून बावीस वर्षे अविरत सेवा केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना कृषी विभागाचा नागरी सेवा क्षेत्र सेवेचा सर्वोच्च सन्मान सेवारत्न मिळाला आहे.

माझ्या यशात ज्ञात अज्ञात आपण सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ, प्रतिसाद, प्रोत्साहन, मदत केल्यामुळे हे सर्व शक्य झाले. त्यामध्ये आपला खारीचा वाटा आहे. या पुरस्काराबद्दल आपण मोठ्या मनाने भरभरून कौतुक, शाब्बासकी वाहवा केली व मला भविष्यात आणखीन चांगले काम करण्याचे प्रोत्साहन दिले. त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. मनापासून धन्यवाद व सदैव ऋणी !! भविष्यास साथ सहकार्याची अभिलाषा !! – सेवारत्न सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी, नातेपुते

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.